Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांचे निधन

अनेक वेळा भुषवले मुख्यमंत्री पद, जनतेत लोकप्रिय, केला होता 'हा' विक्रम

हरियाणा – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे आज सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. गुरुग्राम येथील राहत्या घरी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते इंडियन नॅशनल लोक दलचे प्रमुख होते.

ओमप्रकाश चौटाला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी हरियानातील सिरसा जिल्ह्यातील चौटाला गावात झाला. चौटाला हे हरियानाचे 7 वे मुख्यमंत्री होते. चाैटाला २ डिसेंबर १९८९ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. यानंतर ते १२ जुलै १९९० रोजी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २२ मार्च १९९१ रोजी ते पुन्हा मुख्यमंत्री झाले, शेवटी चाैटाला २४ जुलै १९९९ रोजी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यांचे वडील चौधरी देवीलाल चौटाला यांनी हरियाना राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर देवी लाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भारताचे उपपंतप्रधान देखील बनले.
ओमप्रकाश चौटाला यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी १०वी आणि १२वीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली होती. त्यांना दहावीच्या इंग्रजी विषयात ८८ टक्के गुण मिळाले होते. चौटाला यांच्या निधनामुळे हरियाणा आणि देशाच्या राजकारणात शोककळा पसरली आहे.

ओमप्रकाश चौटाला यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. अजय आणि अभय चौटाला. अजय आणि अभय चौटाला यांना दोन मुले आहेत. अजय चौटाला यांच्या मुलांची नावे दुष्यंत आणि दिग्विजय चौटाला आहेत. दोघेही राजकारणात आहेत. अभय चौटाला यांच्या मुलांची नावे कर्ण आणि अर्जुन चौटाला आहेत. दोघेही राजकारणात आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!