
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेससह या पंधरा पक्षाची मान्यता रद्द होणार
निवडणूक आयोगाची नोटीस, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडण्याचे आदेश, नेमके कारण काय?
दिल्ली – बिहारच्या विधानसभा निवडणुकीआधी या राज्यातील नोंदणीकृत परंतु राजकीयदृष्ट्या पूर्ण निष्क्रियावस्थेत पोहोचलेल्या किमान १५ राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. यात राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. २०१९ पासून कोणत्याही निवडणुकीत भाग न घेतलेल्या १५ पक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. मुख्य निवडणूक आपली भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने या पक्षांना दिला आहे. बिहार राज्यात नोंदणी करत असलेले परंतु २०१९ पासून कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत भाग न घेतलेले हे १५ पक्ष आहेत. मागील सहा वर्षापासून हे पक्ष निष्क्रिय आहेत. कुठल्याही निवडणुकीत ह्या पक्षांनी भाग घेतला नाही. ह्यामुळे निवडणूक आयोगाने ही कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे बिहारमध्ये निवडणूक येऊन ठेपल्या असताना आता हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत सूचीबद्ध पक्षांना अनेक सुविधा दिल्या जातात. परंतु सतत निष्क्रिय राहिल्यास त्यांची मान्यता आणि फायदे काढून घेतले जाऊ शकतात. गेल्या महिन्यातही आयोगाने बिहारमधील अनेक निष्क्रिय पक्षांना यादीतून वगळले होते. त्यानंतर लवकरच या १५ पक्षांच्या भविष्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. निवडणूक आयोगाने नोटीस पाठवलेल्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाचा सुध्दा समावेश आहे. पण ही राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील राष्ट्रवादी नसून बिहारमध्ये नोंदणी केलेला दुसराच एक पक्ष आहे. एखादा राजकीय पक्ष स्थापन केला असता त्याची अधिकृत नोंद निवडणूक आयोगाकडे करणे गरजेचे असते. नोंदणी केलेल्या पक्षाला निवडणूक आयोग काही विशेष सवलती देत असते. तसेच राजकीय दृष्ट्या निष्क्रिय झालेल्या पक्षांची मान्यता कडून घेण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाकडे असतो.
ज्या १५ पक्षांवर मान्यता रद्द होण्याची टांगती तलवार आहे ते असे – भारतीय अवाम कार्यकर्ता पार्टी, भारतीय जागरण पार्टी, भारतीय युवा जनशक्ती पार्टी, एकता विकास महासभा पार्टी, गरीब जनता दल (धर्मनिरपेक्ष), जय जनता पार्टी, जनता दल हिंदुस्थानी, लोकतांत्रिक जनता पार्टी (धर्मनिरपेक्ष), मिथिलांचल राष्ट्रवादी पार्टी, राष्ट्रीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस , राष्ट्रीय सद्भावना पार्टी, वसुधैव कुटुंबकम पार्टी, वसुंधरा जन विकास दल आणि यंग इंडिया पार्टी.