Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! शरद पवार गटाच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा

अजित पवार गटात करणार प्रवेश, शरद पवार गटाला धक्का, ही समीकरणे बदलणार?

शिर्डी – विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते अस्वस्थ आहेत. खासकरून लोकसभेला मिळालेल्या यशानंतर महायुतीतील अनेक नेते महाविकास आघाडीत सामील झाले होते. पण आता ते पुन्हा एकदा महायुतीकडे जात आहेत. आता एक आमदार शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, जेव्हा सतीश चव्हाणांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी सोडली होती, तेव्हा त्यांचे पक्षाकडून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. पण आता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. सतीश चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांना रामराम ठोकून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढण्याकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. पण शरद पवार यांच्या पक्षात आलेल्या सतीष चव्हाण यांना भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी निवडणुकीत पराभवाचा धक्का दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधीच पक्षाची साथ सोडणार असल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे अवघे १० आमदार निवडून आले आहेत.

सतीश चव्हाण हे शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते आहेत. ते २००८ सालापासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून ते विधानपरिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. सतीश चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य, सिनेट सदस्यपदीही काम केलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!