
मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ सात मंत्र्यांना मिळणार नारळ
मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अमित शहांनी यादी पाठवली?
मुंबई – महाराष्ट्रात झालेल्या विधनसभा निवडणूकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. पण सत्ता स्थापन होऊन सात ते आठ महिने होऊनही सरकारला सुर सापडलेला नाही. सरकार नेहमीच वादग्रस्त राहिलेले नाही. आमदार नाहीतर मंत्रीही वादात अडकत आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मंत्रीमंडळातून सहा जणांना डच्चू मिळणार असल्याचा दावा केला आहे. आणि आता मंत्रालयातील वातावरण याला दुजोरा दिल्यासारखे आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी ६ ते ७ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या सूचना केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या मंत्र्यांमध्ये माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, संजय राठोड, गिरिश महाजन, दादा भुसे, योगेश कदम यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘राज्याच्या राजकारणात रंगेल आणि रगेल लोक आली आहेत. एक मंत्री विधानसभेत बसून रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री लाखो रुपयांच्या नोटांच्या बॅगांचं प्रदर्शन करत सिगारेट फुंकतोय. तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीच्या हत्येचा आरोप पचवून, अगदी बिनधास्तपणे उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसतोय. चौथा मंत्री नाशिकच्या चर्चित हनी ट्रॅप प्रकरणातून स्वतःला सोडवण्याची धडपड करतोय, तर पाचवा मंत्री इतरांना अडकवण्याच्या नादात स्वतःच जाळ्यात सापडलाय. रम, रमी, रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झाला आहे, अन् कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच नाचवत आहे’, अशी टिका सामनातून करण्यात आली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता, त्यानुसार मंत्र्यांच्या कामाचं ॲाडीट झालंय. कोण मंत्री कसा काम करतो, काय करोत याचं ॲाडीट पूर्ण, यानुसार ॲाडीटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांमध्ये बदल होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार पुन्हा प्रचंड बहुमतासर सत्तेत आलं आहे. पण या सरकारला विरोधी पक्षांकडून कुठलाही धक्का नसला तरी अंतर्गत कलहाच्या वादळाची धास्ती कायम असणार आहे. त्यामुळे फडणवीस यांना कायम संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.