Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! वाल्मिक कराडला पुण्यातून अटक

सीआयडी पथकाची मोठी कारवाई?, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला गती येणार?

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड याला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली गेल्याची शक्यता आहे.

वाल्मिक कराड यांच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बॅंक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचेही बॅंक खाते गोठवण्यात आले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता २१ दिवस उलटले आहेत. तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहे. सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु केल्याने त्यांच्यावरील मानसिक दबावही वाढला होता. याशिवाय, बँक खाती गोठवून केलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे वाल्मीक कराड याच्यासमोर आता कोणताही पर्याय उरला नसल्याने कराड शरण येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर सीआयडीने कराडला पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे वाल्मीक कराड यानेच हाताळल्याचे सांगितले जात आहे. याच वाल्मिक कराड कनेक्शनमुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आले होते. त्या गाडीची सीआयडीकडून तपासणी करण्यात आली. या गाडीतील ठसे आणि आरोपींच्या हातांचे ठसे जुळले आहेत. याशिवाय, आरोपींचे मोबाइलही पोलिसांनी तपासणीसाठी फॉरेन्सिकडे पाठवले आहेत. पोलीस आणि सीआयडीकडून याप्रकरणी आतापर्यंत १०० संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.

जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना आधीच अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे अद्यापही फरार आहेत. दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामुळे याप्रकरणातही कराड याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!