मोठी बातमी! भाजपा एकनाथ शिंदेंची शिवसेना फोडणार?
भाजपा एकनाथ शिंदेना राजकारणातून संपवणार?, शिंदे गटातील 'या' मंत्र्याबरोबर हे वीस आमदार?
मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यावेळी ४० आमदारांची त्यांना साथ मिळाली होती. पण आता महायुती पूर्ण बहुमताने सत्तेत आली आहे. पण एकनाथ शिंदे सतत अडवणूकीची भूमिका घेत असल्यामुळे भाजपाचे नेतृत्व त्यांच्यावर नाराज असून लवकरच शिंदेसेनेतही फूट पाडण्याची योजना भाजपाकडून आखण्यात येत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच तिसरा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरुन वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे नाराज शिंदे दरे गावी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली असून नवीन ‘उदय: पुढे येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराजी दाखवून काही पदरात मिळेल, हा प्रयत्न सुरू आहे. शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे, शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला होतील अशी भीती आहे. उद्धव ठाकरे यांना संपवून शिंदेंना आणलं. आता शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यावर आता शिवसेना संजय राऊत यांनीदेखील एक मोठा दावा केला आहे. ‘उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार आहेत.’ असा दावा त्यांनी केला आहे. “महायुतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते. त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपची योजना होती,” असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.
शनिवारी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली, मात्र या यादीमध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळू शकलेलं नाही. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे हा वाद सोडवला जाणार की वाद वाढत जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.