Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! संग्राम थोपटे, संजय जगताप भाजपात प्रवेश करणार?

पुणे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होणार? अजित दादांना शह देण्यासाठी भाजपात? पण ही अडचण?

पुणे – लोकसभेला दणदणीत यश मिळवलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मात्र अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. अनेक वर्ष केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसल्यामुळे काँग्रेसला गळती लागली आहे. त्यातच आता काँग्रेसचे महत्वाचे दोन माजी आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील काँग्रेस इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. पण भाजपाला मात्र बळ मिळण्याची शक्यता आहे.

पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप आणि भोर – राजगड – मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. भाजपा राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यात आपले पाय बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण दाैंड वगळता इतर ठिकाणी त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे पुरंदर आणि भोरच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांकडे वाटाघाटी करत आहेत. अजित पवारांना शह देण्यासाठी हे दोन्ही नेते भाजपासठी महत्वाचे आहेत. संग्राम थोपटे यांना त्यांच्या ताब्यातील राजगड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास मंडळाच्या कर्जाची अत्यंत आवश्यकता आहे. अजित पवार यांनी हे मंजूर झालेले कर्ज अडवून ठेवले आहेत. पण ते भाजपात गेल्यास अजित पवार यांचा अडसर दुर होणार आहे. त्यामुळे थोपटे भाजपात जाण्यास तयार आहेत. यासाठी त्यांनी भाजपप्रवेशासाठी त्यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली आहेत. तर पुरंदरमध्ये शिवतारेंना शह देण्यासाठी जगताप यांना बळ देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पण दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा विरोध आहे. तसेच यामुळे महायुतीतही खटके उडू शकतात. त्यामुळे हे दोन्ही नेते भाजपात कधी जाणार? ही काँग्रेसमध्येच राहणार याचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यात जगताप आणि थोपटेंच्या माध्यमातून काँग्रेसचे दोन आमदार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. तर, कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाल्याने काँग्रेसचे जिल्ह्यात तीन आमदार होते. पण या विधानसभेला तीनही नेत्यांचा पराभव झाल्याने पुण्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!