
मोठी बातमी! एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतही बंड होणार?
बंडापासून वाचण्यासाठी एकनाथ शिंदेचा शिवकोष उपाय, भाजपाच्या आशिर्वादामुळे फुटीचा 'उदय'
मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला आता ३ वर्ष पूर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे जरी आता उपमुख्यमंत्री असले तरीही शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आता शिंदे कडे आहे. पण आता एकनाथ शिंदेंना देखील एक चिंता सतावत आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे अनेक पदाधिकारी देखील शिंदे गटात केले. यावेळी अनेक शाखांवर शिंदे गटाने दावा केला. ठाण्यातील शाखावादामुळे ठाकरे आणि शिंदे आमनेसामने आल्याची घटना घडली होती. हातात शाखा न राहिल्यामुळे ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले होते. पण आता एकनाथ शिंदे यांना देखील शिवसेनेत पुन्हा बंड होईल याची चिंता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मेळाव्यात एक प्रस्ताव सादर केला आहे. शिंदेसेनेच्या काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला. पक्षाचे कार्याध्यक्ष आणि आमदार बालाजी किणीकर यांनी विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखा या शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या अंतर्गत येतील. त्यांचं व्यवस्थापन विश्वस्त संस्थेकडून पाहिलं जाईल. पक्षनिधी, गरजूंना मदत, पक्षाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रमांचं आयोजन संस्थेकडून केलं जाईल. पक्षाकडून केली जाणारी समाजपयोगी, लोकपयोगी कामंदेखील संस्थेकडून केली जातील. ठाकरेंसोबत घडलेला प्रकार पाहून शिंदे यांनी धडा घेतलेला आहे. भविष्यात तसा प्रकार आपल्या पक्षासोबत घडू नये यासाठी शिंदेसेनेच्या काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पण एकनाथ शिंदे यांना बंड होण्याची भीती का वाटत आहे. याबाबत भाजप कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कारण मध्यंतरी मुख्यमंत्री पदावर अडून बसल्यामुळे उदय सामंत यांना पुढे करत पक्ष फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे अनेक आमदार त्यासाठी तयार देखील होते. त्यामुळे एकनाथ शिंदे आता प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत आहेत.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल संपन्न झाली. त्यात काही महत्त्वाचे ठराव मांडले गेले. यातील शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनाचा प्रस्ताव सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांना पक्ष प्रमुख करण्याची प्रस्ताव होता, पण एकमत न झाल्यामुळे तो प्रस्ताव रद्द करण्यात आला.