Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! ठाकरेंचे हे पाच खासदार शिंदे गटात प्रवेश करणार?

'ऑपरेशन टायगर' शेवटच्या टप्प्यात, नियमासाठी आणखी एक खासदार गळाला, या तारखेला होणार पक्षप्रवेश?

मुंबई – विधानसभा निवडणूकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाला देखील मोठी गळती लागली आहे. पण आता पुन्हा एकदा ठाकरेंचे पाच खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण ५ खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती खळबळजनक माहिती समोर आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरू होण्यापूर्वी किंवा अधिवेशनाच्या कालावधीत एकूण पाच खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ या मोहिमेच्या माध्यमातून हे प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळेच ठाकरे गटातले अनेक खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहेत. हीच आऊटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठा प्रयत्न केला जात आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे. त्यामुळे सहाव्या खासदाराला ही त्यांनी संपर्क केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काही खासदारांची नावे समोर आली असून संजय पाटील यांचा त्या खासदारांमध्ये समावेश असल्याचे बोलले जात आहे.

येत्या ९ जूनपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू करणार असून ‘लढा आपल्या मुंबईचा’ अशी शिवसेनेची टॅगलाइन आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडून जाणार नाही असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!