अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
पहा तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार निधी, काय आहेत नियम?
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीच्या नियमात न बसणाऱ्या पण जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा राज्यातील ५ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
शिंदे सरकारने नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले आहे. पण त्यानंतरही बरेच शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार होते. त्यांना दिलासा देताना शासनाने ७५५ कीडींची तरतूद केली आहे. महाराष्ट्रात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यात आली होती. पण अनेक शेतकरी या मदतीपासुन निकषात न बसल्यामुळे वंचित होते.निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. तसेच गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद, नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शासनाच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र
परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र
बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र
लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र
उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र
एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये