Latest Marathi News
Ganesh J GIF

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी

परीक्षेचे अर्ज भरण्यास 'या' तारखेपासून होणार सुरुवात

पुणे दि २९(प्रतिनिधी) – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. मध्यंतरी बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहिर करण्यात आले होते. आता फाॅर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

मंडळाने जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते २१ ऑक्टोबर पर्यंत कला, वाणिज्य, शास्त्र शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम, नियमित विद्यार्थी, पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार, तुरळक विषय घेऊन बसलेले तसेच आयटीआयचे ट्रान्सफर ऑफ क्रेडीटचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांना २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावीत. आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी सरल डाटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. असे मंडळाने स्पष्ट केले आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर महाविद्यालयांना लॉगिनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

नेहमीच्या पद्धतीने फाॅर्म भरले जाणार आहेत. नियमित शुल्काने आवेदनपत्रे भरायच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रिलिस्ट जमा करायची तारीख नंतर कळविण्यात येईल. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी अधिक माहितीसाठी राज्य मंडळाच्या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!