भाजपा मंत्र्याची मुलगीच करणार भाजपाविरोधात आंदोलन
या मुद्दयावर शिंदे सरकारवर जाधव आक्रमक, बघा नेमक्या काय आहेत मागण्या
ओैरंगाबाद दि १८(प्रतिनिधी)- भाजप पक्षाने संधी दिली तर मी कन्नड – सोयगांवमधून विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या संजना जाधव यांनी आत पक्षाविरोधातच बंडाचे निशाना साधला आहे. त्या लवकरच राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत.
शेतकरी, गोरगरिबांच्या मागण्यासाठी पिशोरमध्ये मंगळवारी जाधव यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संजना जाधव ह्या भाजप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. त्याचबरोबर त्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत. कन्नड-सोयगाव तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी स्वावलंबन आणि श्रावणबाळ योजनेतील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, उर्वरित गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा, पी.एम. सन्मान निधीचा लाभ मिळावा, २०२१-२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १५ कोल्हापुरी बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहे. जाधव यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड केल्याचे दिसत आहे. जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच मोर्चा निघत असल्याने राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे. संजना जाधव या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. कन्नड तालुक्यात त्यांच्या चांगला जनसंपर्क देखील आहे. त्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनासमोर आव्हान निर्माण करणार आहेत.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुलीला आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे. त्या या निवडणुकीत आपल्या पतीलाच आव्हान देणार आहेत. अर्थात जाधव कोणत्याही पक्षाच्या अधिकृत सदस्य नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. याची परिस्थितीत त्यांच्यावर बंधने नसल्यामुळे त्या आंदोलन करणार आहेत.