Latest Marathi News

शिवसैनिकांचे शक्तीपीठ शिवसेना भवनावर कोणाचा हक्क

सामनावर कोणाचा अधिकार राहणार ठाकरे कि शिंदे, पहा कोणाचा आहे हक्क

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यां हातून शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेले आहे. आता त्यावर शिंदे गटाचा अधिकार आहे. पण त्यामुळे शिवसैनिकांचे शक्तीस्थान असणारे शिवसेना भवन आणि शिवसेनेचे मुखपत्र सामना मार्मिक यावर कोणाची मालकी असा प्रश्न उभा राहिला होता. यावर सध्या राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत आहे.

शिवसेनेचे दादरमधील सेना भवन यावर शिवसेनेची मालकी नव्हती. जरी पक्षाचा कारभार तेथून चालवला जात होता तरीही शिवसेना भवनची मालकी शिवाई ट्रस्टकडे आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष सध्या लीलाधर डाके आहेत. ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. यामुळे पक्ष आणि चिन्ह गेले तरी शिवसेना भवन उद्धव ठाकरेंकडेच राहणार आहे. सामना हे शिवसेनेची ओळख आहे. सामनाच्या अग्रलेखाची जोरदार चर्चा नेहमीच होत असते. पक्ष शिंदेकडे गेल्यानंतर सामना कोणाकडे जाणार असा प्रश्न होता पण सामना आणि मार्मिक ही प्रबोधन प्रकाशन संस्थेच्या अख्त्यारित येतात. ही प्रबोधन प्रकाशन संस्था रश्मी ठाकरे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे सामना आणि मार्मिक सुद्धा उद्धव ठाकरेंकडेच राहणार आहेत. पण शिवसेनेचा अनेक शाखा स्थानिक शिवसैनिकांकडुन चालवल्या जातात. त्यामुळे ते ज्यांच्यासोबत जातील त्यांच्याकडे त्या शाखा राहणार आहेत. त्यामुळे शिंदेचे शिवसेना भवन हस्तगत करण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. त्यावर दावा करता येणार नसल्याचे स्पष्ट आहे.

शिंदे गटाकडे आता अधिकृतपणे विधानभवनातील शिवसेनेचं कार्यालय, मंत्रालय समोरचे शिवसेनेचे शिवालय हे कार्यालय असणार आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत शिवसेनेला मिळालेल्या देणगी असेल किंवा पक्ष निधी असेल यावर देखील शिंदे गटाकडून दावा सांगण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळातही संघर्ष कायम राहणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!