
कर्नाटक दि ३ (प्रतिनिधी) – एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी महिला सन्मानाबद्दल बोलत असतात. पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते हा आदेश धुडकावत लावत महिलांसोबत गैरवर्तन करत आहेत. आता भाजप आमदार अरविंद लिंबावली यांचा एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
कर्नाटकात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे वरथूरमध्ये पीडित महिलेने आमदाराला तक्रार पत्र देण्याचा आणि काही समस्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भाजप आमदार अरविंद लिंबवली चांगलेच संतप्त झाले. त्या महिलेच्या हातात एक कागद होता आणि तो आमदाराला दाखवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र आमदाराने तो हिसकावून फाडला. यानंतर त्यांनी पोलिसांना महिलेला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.यावेळी त्यांनी त्या महिलेला शिविगाळ देखील केली. जर लोकप्रतिनिधीच असे वर्तन.करत असतील तर समस्या कोणापुढे मांडायचा आणि महिला सक्षमीकरणाच्या फक्त घोषणा द्यायच्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लिंबावली यांचा एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून लिंबावली यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर महिला आयोग देखील या घटनेची नोंद घेण्याची शक्यता आहे. पण भाजप संसाराच्या या कृत्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.