पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा की काँग्रेसची हवा, अंदाज समोर
लोकसभेपुर्वीच्या पाच राज्यांचे निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर, काँग्रेस भाजपात टाय, कोणत्या राज्यात कोणाची सत्ता
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. तत्पूर्वी लोकसभेपुर्वी सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांची निवडणुक नुकतीच पार पडली. पाचही राज्यांचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण तत्पूर्वी निकालाआधीचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलनुसार काँग्रेस आणि भाजपातील लढतीत बरोबरी होण्याची शक्यता आहे.
छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यानुसार राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपा तर छत्तीसगड आणि तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार स्थापण होण्याची शक्यता आहे. तर मिझोरममध्ये स्थानिक आघाड्यांचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सध्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस, मध्यप्रदेशमध्ये भाजपा, तेलंगाणात बीआरएस तर मिझोरममध्ये स्थानिक आघाडी सत्तेत आहे. सर्वसाधारण निकाल पाहिल्यास भाजपाला दोन आणि काँग्रेसला दोन राज्य मिळण्याची शक्यता आहे. तर मणिपूरमध्ये स्थानिक आघाडीचाच बोलबाला राहणार आहे.
छत्तीसगड
*इंडिया टूडे एक्सिस माय इंडिया*
काँग्रेस: ४०- ५०, भाजप: ३६- ४६, अन्य: १-५
*जन की बात*
काँग्रेस: ४२- ५३, भाजप: ३४- ४५, अन्य: ०-३
*सी वोटर*
काँग्रेस: ४१- ५२, भाजप: ३६-४८, अन्य: ०-४
*टूटेज चाणक्य*
काँग्रेस: ४९- ६५, भाजप: २५- ४१, अन्य: ००
राजस्थान
*इंडिया टूडे एक्सिस माय इंडिया*
काँग्रेस: ८६- १०६, भाजप: ८०- १००, अन्य: ०९-१८
*जन की बात*
काँग्रेस: ९०- १००, भाजप: १००- ११०, अन्य: ०५- १५
*पोलस्ट्रॅट*
काँग्रेस: ९०- १००, भाजप: १००- ११०, अन्य: ०५- १५
मध्य प्रदेश
*इंडिया टूडे एक्सिस माय इंडिया*
भाजप: १४०- १६२, काँग्रेस: ६८- ९०, अन्य: ०-३
*जन की बात*
भाजप: १००- १२३, काँग्रेस: १०२- १२५, अन्य: ०-५
तेलंगणा
*पोलस्ट्रॅट*
बीआरएस: ४८-५८, काँग्रेस: ४९- ५६, भाजप: ०५- १०, अन्य: ०६- ०८
*टुडेज चाणक्य*
बीआरएस: २४- ४२, काँग्रेस: ६२-८०, भाजप: ०२-१२, अन्य: ०५-११
मिझोराम
*जन की बात*
एमएनएफ: १५-२१, झेडपीएम: १२- १८, काँग्रेस: ०२- ०८, अन्य: ००- ०५
*सी वोटर*
एमएनएफ: १५-२१, काँग्रेस: २-८, झेडपीएम: १२-१८, बीजेपी: ००, अन्य: ००- ०५