भाजपाची तिसरी यादी जाहीर ; यादीत २५ उमेदवारांचा समावेश, बोरिवलीतून आमदार सुनील राणे ऐवजी संजय उपाध्याय यांना उमेदवारी
भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत २५ उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपानं १४६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.आजच्या यादीत विदर्भातील बहुतांश जागांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपानं तिसऱ्या यादीत बोरिवलीचे आमदार सुनील राणेंचा पत्ता कट केला आहे. त्यांच्याऐवजी संजय उपाध्याय यांना भाजपाने उमेदवारी दिली. तर वर्सोव्यातून भारती लव्हेकर यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. घाटकोपरमधूनही पराग शाह यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. काटोलमधून इच्छुक असणारे आशिष देशमुख यांना सावनेर मतदारसंघातून उतरवण्यात आले आहे.
तिसऱ्या यादीत कुणाला संधी?
मूर्तिजापूर – हरिश पिंपळे
कारंजा – सई प्रकाश डहाके
तिवसा – राजेश वानखडे
मोर्शी – उमेश यावलकर
आर्वी – सुमित वानखेडे
काटोल – चरणसिंग ठाकूर
सावनेर – आशिष देशमुख
नागपूर मध्य – प्रवीण दटके
नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
नागपूर उत्तर – मिलिंद माने
साकोली – अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
आर्णी – राजू तोडसाम
उमरखेड – किशन वानखेडे
देगळूर – जितेश अंतापूरकर
डहाणू – विनोद मेढा
वसई – स्नेहा दुबे
बोरिवली – संजय उपाध्याय
वर्सोवा – भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व – पराग शाह
आष्टी – सुरेश धस
लातूर शहर – अर्चना पाटील चाकूरकर
माळशिरस – राम सातपुते
कराड उत्तर – मनोज घोरपडे
पलूस कडेगाव – संग्राम देशमुख