दोघीजणी कामावरून निघाल्या पण घरी पोहोचल्याच नाही
त्या दोन तरुणींसोबत नेमक काय घडलं, त्या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल, काय घडलं?
नवी मुंबई – कामावरून घरी जाताना दुचाकीचा अपघात झाल्यामुळे दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये ही घटना घडली आहे. या दोन्ही तरुणी नाईट शिफ्ट करून घरी जात होत्या. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.
संस्कृती खोकले आणि अंजली पांडे असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतींचे नावे आहेत. ही घटना नवी मुंबईतील कोपरी येथील पामबीच मार्गावर घडली. संस्कृती खोकले आणि अंजली पांडे दोघीही तुर्भे एमआयडीसी मध्ये खासगी कंपनीत कामाला होत्या. कामावरून सुटल्यानंतर दोघीही कोपरीच्या दिशेने विरुद्ध मार्गावरून येत होत्या. बोनकोडे जवळ असणाऱ्या वीरशैव स्मशान भूमिनजीक त्या आल्या असता समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात झाल्यावर कारचालक मदत न करता निघून गेला. यात दुचाकी चालक संस्कृती जागीच ठार झाली तर अंजलीला आसपासच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना चारच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी अज्ञात कार चालकावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठयात राहणारी संस्कृती खोकले आपली मैत्रीण अंजली पांडे हिला बोनाकोड्यातील घरी सोडण्यासाठी जात होती. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.
स्कोडा कारचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. आम्ही त्या कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारचा नंबर व त्या चालकाला शोधण्यासाठी आम्ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रित केलेलं फूटेज तपासत आहोत, असं एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले.