Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मोदी सरकारचा सामान्यांना झटका, खिशाला मोठा फटका! आता 'इतके' रूपये मोजावे लागणार?

दिल्ली – सर्वसामान्यांना मोदी सरकारने जोरदार झटका दिला आहे. पेट्रोल, डिझेल उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर आता सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ५० रूपयांची दरवाढ केली आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असतानाच घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅसची किंमत वाढवल्याने आर्थिक ताण वाढवाणर आहे. विशेष म्हणजे महागाईविरोधात आवाज उठवत सत्तेत आल्याने भाजपाच्या कार्यकाळात म्हणजेच २०१४ पासून गॅस सिलेंडर अडीचपट महाग झाले आहेत. उज्वला योजनेतील सिलिंडरच्याही दरात वाढ करण्यात आली आहे. उज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील दरवाढ लागू होणार आहे. सिलेंडर दर वाढीच्या या निर्णयामुळे सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सध्या सिलेंडर ५०० रुपयाला मिळत असून त्याचा दर ५५० रुपये होणार आहे. तर मुंबईत सध्या गॅस सिलेंडर ८१० रुपयांना मिळत असून त्याची किंमत ८६० रुपयांना मिळणार आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. भारतात यापूर्वी काही काळ गॅस दरात स्थिरता होती, मात्र जागतिक बाजारात होणाऱ्या वाढीचा परिणाम आता आपल्या देशावरही होऊ लागला आहे. त्यामुळे दरात ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र १ एप्रिलला ४४.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. दरम्यान अचानक झालेल्या या दरवाढीचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होणार आहे. आधीच खाद्यपदार्थ, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना एलपीजी सिलेंडर महाग झाल्यामुळे अनेक कुटुंबांना महिन्याचा खर्च चालवणे कठीण होणार आहे.

केंद्र सरकारच्या महसूल विभागाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!