
ब्रेकिंग! उद्योगमंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार?
एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपा नाराज, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पाडली फूट? ते वीस आमदार कोण?
मुंबई – महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश संपादित करत सत्ता स्थापन केली आहे. पण एवढे विराट बहुमत असताना देखील सरकारमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे नागरिकदेखील सरकारवर नाराज आहेत. खासकरुन एकनाथ शिंदे यांच्या सततच्या नाराजीमुळे भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व नाराज आहे. त्यामुळे शिंदेसेनेतील मोठा गट गळाला लावण्याचा प्रयत्न होत आहे.
महायुतीतील वादानंतर उद्योगमंत्री उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या जागी उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरु झाली आहे. महायुती सरकारनंतर स्थापन झालेल्या युतीच्या सरकारमध्ये सामंत उद्योगमंत्री होते. आताही त्यांच्याकडे तेच खाते आहे. पण विशेष म्हणजे निकालानंतर मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्या काळात शिंदे उपमुख्यमंत्री घेणार नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या तेंव्हा देखील उदय सामंत उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. त्याआधीही म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उदय सामंत हे ठाकरेंसोबत होते. पण फडणवीस यांचा फोन आल्यानंतर सामंत यांनी गुवाहाटी गाठली होती. त्यामुळे सामंत शिंदे यांच्यापेक्षा फडणवीस यांच्याशी निष्ठा ठेऊन आहेत का? अशी चर्चा होत आहे. उदय सामंत हे राष्ट्रवादी, शिवसेना आणि मग शिंदे गट असा प्रवास केला आहे. त्यामुळे राजकीय प्रवाहासोबत खाण्याकडे त्यांचा कल दिसून आला आहे. त्यामुळे जर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना दुर सारण्याचा निर्णय घेतल्यास सामंत हे आजवरचा राजकीय अनुभव पाहता भाजपासोबत जातील अशीच अटकळ बांधली जात आहे. विशेष म्हणजे या सरकारमध्ये मंत्रीपद न मिळालेले तानाजी सावंत, विजय शिवतारे यांच्याकडूनही सामंत यांना बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिंदे नाराज असूनही कोणताही भाजपाचा नेता त्यांची नाराजी दुर करताना दिसून येत नाही. त्यामुळे शिंदे यांना दुर सारत उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळे कुणीही आमच्यात वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तरीही चर्चा थांबलेल्या नाहीत.