Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

निवडणुकीसाठी असणार ४१ प्रभाग, १६५ जागांसाठी होणार लढाई, हा प्रभाग सर्वात मोठा, तर हा लहान प्रभाग

पुणे – महाराष्ट्रात महापालिका निवडणूकाचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे लक्ष प्रभाग रचनेकडे लागले होते. अखेर ती उत्सुकता संपली असून पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. २०११ च्या लोकसंख्येआधारे ही रचना जाहीर करण्यात आली आहे.

जाहीर केलेल्या प्रभागरचनेनुसार महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. त्यातील ४० प्रभागांतून चार नगरसेवक तर एका प्रभागातून पाच असे एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. आंबेगाव कात्रज हा प्रभाग पाच नगरसेवकांचा राहणार आहे. सुरुवातीला प्रभाग रचना महानगरपालिकेने नगर रचना विभागाला पाठवली होती. यामध्ये महानगरपालिकेने ३ प्रभाग, ३ सदस्य प्रस्ताव पाठवला होता. प्रस्ताव नगर रचना विभागाला गेल्यानंतर ३ सदस्य प्रभाग न ठेवता ५ सदस्य एकच प्रभाग केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार २०११ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्या गृहीत धरत ही प्रभारगरचना करण्यात आली आहे. त्यानुसार आंबेगाव- कात्रज हा सर्वाधिक मोठा प्रभाग ठरला आहे. त्याची लोकसंख्या १,१४,९७० आहे. तर अप्पर सुपर इंदिरानगर हा ७५,९७७ लोकसंख्येने लहान प्रभाग ठरला आहे. जाहीर केलेल्या प्रभागरचनेनुसार कळस- धानोरी हा प्रभाग क्रमांक एक असणार आहे. तर नव्याने समाविष्ट झालेला महंमदवाडी- उंड्री प्रभाग ४१ असणार आहे. सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर हे प्रारूप महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर करण्यात आले होते.

प्रारूप प्रभाग रचनासंदर्भात नागरिकांच्या हरकती/ सूचना २२ ऑगस्ट २०२५ ते ३ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येतील,असे पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!