Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! महायुती सरकारने या जिल्ह्याचा पालकमंत्री अचानक बदलला

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, महायुतीतील बेबनाव चव्हाट्यावर, राजकीय समीकरणे बदलणार?, कारण काय?

मुंबई- महायुतीचे सरकार स्थापन होऊन वर्ष होत आले असले तरीही अद्याप पालकमंत्री पदाचा वाद संपलेला नाही. नाशिक आणि रायगड हे दोन जिल्हे पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेत असताना , विदर्भातील एक जिल्ह्यातील पालकमंत्री अचानक बदलण्यात आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एका जिल्ह्यामध्ये पालकमंत्री बदलला आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांची अचानक जबाबदारी काढून घेण्यात आली असून त्यांच्या जागी वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांना ही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्यापासून लांबचे कार्यक्षेत्र आहे, त्यामुळे त्यांना सतत प्रवास शक्य नव्हता. तसेच काही स्थानिक भाजप नेते सावकारे यांच्या कार्यशैलीवर नाराज होते.पालकमंत्री फक्त ध्वजवंदनापुरते न राहता प्रशासनावर पकड असावी, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. या बदलामुळे भंडाऱ्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल, असा स्थानिकांचा विश्वास आहे. दुसरीकडे, संजय सावकारे यांच्या अचानक बदलीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. पंकज भोयर हे वर्ध्याचे सुद्धा पालकमंत्री आहेत. वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना पंकज भोयर यांनी आपली छाप उमटवली होती.

सावकारे यांना आता केवळ बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे. अचानक झालेल्या पालकमंत्री बदलल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. असे असले तरीही अद्याप रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!