
ब्रेकिंग! या क्रिकेटपटूच्या पत्नीला लागली मंत्रिपदाची लॉटरी
नवीन १९ मंत्र्यांसह २६ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपदाचा सिक्सर, पहा यादी
गांधीनगर – गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. रिवाबा जडेजा यांनाही मंत्रिपदाची शपथ दिली गेली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर करत गुजरातमध्ये मोठा फेरबदल केला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर १९ नवीन चेहऱ्यांसह २६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा या आता मंत्री बनल्या आहे. त्यांच्यावर मोठी राजकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या गुजरातच्या नवीन मंत्रिमंडळात रिवाबा यांचा समावेश करण्यात आला आहे. जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा आता २६ सदस्यीय नवीन मंत्रिमंडळाचा भाग आहेत. २ नोव्हेंबर १९९० रोजी राजकोट येथे जन्मलेल्या रिवाबा पहिल्यापासून सामाजिक कार्याशी संबंधित कुटुंबातील आहेत. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रिवाबा यांचे काका हरिसिंह सोलंकी हे राजकोटमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. २०१६ मध्ये रिवाबा यांचे क्रिकेटपटू रवींद्र जडेजाशी लग्न झाले. रिवाबा आणि रवींद्र जडेजाचे राजकोटमध्ये रेस्टॉरंटही आहे. त्यांना निध्याना नावाची एक मुलगी आहे. रिवाबा ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरी सिंह सोळंकी यांची नातेवाईक आहे. रिवाबा राजपूत समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करणी सेनेची सदस्या देखील राहिली आहे. ती करणी सेना महिला शाखाची प्रमुख देखील होती. रिवाबानं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. रिवाबा ही जामनगर – सौराष्ट्र क्षेत्रात चांगलीच सक्रीय आहे. रविंद्र जडेजा हा मूळचा जामनगरचा आहे.
सर्व मंत्र्यांची यादी भूपेंद्र पटेल, त्रिकम बीजल, चांगास्वरुपजी ठाकोर, प्रत्रवणकुमार गोर्धनजी माळी, ऋतिकेश गणेशभाई पटेल, पीसी बराडा, दर्शना एम. वाघेला, कांतीलाल शिवलाल अमृतिया, वरजीभाई मोहनभाई बावलिया, रिवाबा जडेजा, अर्जून मोढवाडिया ,डॉ. प्रद्यमन वाजा, कौशिक कांतीभाई वेकरिया, परशोत्तम सोलंकी, जितेंद्रभाई सावजीभाई वाघाणी, रमणभाई भीखाभाई सोलंकी, कमलेशभाई रमेशभाई पटेल, संजय सिंह महेदा, रमेशभाई भूराभाई कटारा, मनीषा राजीवभाई वकील, ईश्वर सिंह ठाकोर, भाई पटेल, प्रफुल पानसेरिया, हर्ष सांघवी, जयारामभाई गामित नरेशभाई पटेल, कनुभाई देसाई.