Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! आमदार रोहित पवार भाजपात प्रवेश करणार?

पवार कुटुंबात लवकरच दुसरा राजकीय भूकंप, त्या उपक्रमामुळे भाजपा प्रवेशाची चर्चा, उत्तर प्रदेश कनेक्शन?

अ. नगर – शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देण्यास तत्पर असतात. पण आता कोणतीही घटना घडल्यावर आक्रमक होणारे रोहित पवार कमालीचे मवाळ झाले आहेत. तसेच त्यांच्या एका उपक्रमामुळे रोहित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

रोहित पवार यांनी कर्जत मतदारसंघात सलग दुसरा विजय मिळवला. पण त्यांना यावेळेस बरीच मेहेनत करावी लागली. त्यांना अगदीच निसटता विजय मिळाला. तसेच महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, त्यामुळे मंत्रीपदाची आस असलेले रोहित पवार अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान निवडणूकीआधी रोहित पवार अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा होती. पण त्यांनी मोठ्या पवारांची साथ दिली. रोहित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद हवे आहे. पण जयंत पाटील अजूनही पदावर कायम आहेत. त्यामुळे रोहित पवार पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे रोहित पवार भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. कारण महाविकास आघाडीचे नेते महाकुंभवर टिका करत असताना रोहित पवार मात्र महाकुंभमध्ये जाऊन स्नान करुन आले आहेत. एवढेच नाहीतर त्यांनी आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रत्येक घरात महाकुंभमधील पवित्र जल, सोबत रुद्राक्षाची माळ आणि गायत्रीमंत्राचे कॅसेटचे वाटप करत आहेत. पवार कुटुंबीची पार्श्वभूमी पुरोगामी राहिलेली आहे. अजित पवार जरी महायुतीत असले तरीही त्यांनी एक हे तो सेफ हे या विधानाचे समर्थन केले नव्हते. तसेच अलीकडे रोहित पवार हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार पक्षातील मंत्र्यावर टिका करत आहेत. त्यामुळे ते लवकरच भाजपात जातील अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे पवार कुटुंबात लवकरच दुसरा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे.

कर्जत जामखेडा मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. फेरमतमोजणीनंतर रोहित पवार विजयी झाले. आमदार रोहित पवार फक्त १२५८ मतांनी विजयी झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!