
ब्रेकिंग! आमदार रोहित पवार भाजपात प्रवेश करणार?
रोहित पवार हे मनाने भाजपातच, प्रवेशासाठी घेतल्या या नेत्यांच्या भेटी, २०१९ पासूनचा घटनाक्रम समोर?
सिंधुदुर्ग – राज्याच्या राजकारणामध्ये सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. कारण पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातच आता एका मंत्र्याने मोठा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
आमदार रोहित पवार हेच भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे म्हणाले की, रोहित पवार हे २०१९ सालीच भाजपात येणार होते. ते कुठल्या वेळी कोणत्या भाजपाच्या नेत्यांना भेटात हे आम्ही बोलायला लागलो तर रोहित पवार यांनात तोंड वाचवायला जागा राहणार नाही. रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत. शरीराने शरद पवार यांच्या पक्षात आहेत, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. रोहित पवारांनी राष्ट्रवादीत ३ गट पडले असल्याचा दावा केला होता. मात्र, आज नितेश राणे यांनी रोहित पवारांबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार भाजपा तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी वेळोवेळी टीकेचे आसूड ओढलेले आहेत. रोजगार, शिक्षण, शेती आदी क्षेत्रांतील प्रश्नांना घेऊन ते सरकारला घेरताना दिसतात. असे असताना आता नितेश राणे यांनी त्यांच्याबाबत वरील दावा केला आहे. त्यामुळे आता राणे यांच्या दाव्यावर रोहित पवार नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शशिकांत शिंदे यांची प्रदेशध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची आणि पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, या नव्या जबाबदारीमुळे रोहित पवार यांचे त्यांच्या पक्षातील वजन वाढलेले आहे.