Latest Marathi News
Ganesh J GIF

‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीचा निर्घुण खून

लग्नाची मागणी आणि संतप्त तरुणाने छातीवर वार करत केली हत्या, उपचारासाठीही संघर्ष, महाराष्ट्र हादरला

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सानिका भरत नरसिंगे असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सतीश यादव असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. समीक्षा ऊर्फ सानिका हिचे २०१९ मध्ये लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणाशी लग्न झाले होते. पण, सहाच महिन्यांत दोघांनी वादामुळे घटस्फोट झाला. सानिकाने तिची मैत्रीण आयुषी अंम्पले हिच्यासोबत इव्हेन्ट मॅनेजमेंटची कामे सुरू केली होती, यातून तिची ओळख सतीश यादव याच्याशी झाली. तिघेही गेले चार महिने सरनोबतवाडीत फ्लॅटवर राहात होते. लग्न, बारसे, जावळ यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन तिघांनी एकत्रितपणे घेतले होते. त्यासाठी लागणारे साहित्यही खरेदी करून ते सरनोबतवाडीतील फ्लॅटवर आणले होते. यामुळे कसबा बावड्यातून सानिकाही आई व बहिणीपासून वेगळी सरनोबतवाडीत फ्लॅटवर राहू लागली. पण, काही दिवसांपासून सतीश तिला लग्नाची मागणीही घालत होता. सानिकाला त्याच्याशी लग्न करायचे नसल्याने दोघांत वाद झाला होता. सध्या सिझन संपल्याने त्यांनी घर खाली करण्याचे ठरवले होते. त्यामुळे सामान घेऊन जाण्यासाठी सानिका आणि तिची मैत्रीण त्याठिकाणी आल्या होत्या. साहित्याची आवराआवर करताना तिने सतीशला फोन केला. सुमारे १५ मिनिटांत पोहोचलेल्या सतीशने लग्नाचा आग्रह धरत समीक्षासोबत वाद घातला. पण समीक्षाने नकार दिल्याने सतीशने धारदार शस्त्राने वार केला. छातीत खोलवर जखम होताच समीक्षा चाकूसह कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला लाथा मारून सतीशने घराचे दार बाहेरून बंद करून पळ काढला. त्यानंतर तिच्या मैत्रीणीने फोनवर मित्राला बोलवून घेतले. आणि सानिकाला रूग्णालयात दाखल केले. पण तिचा मृत्यू झाला. सानिकाच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. कसबा बावडा येथे तिची आई, बहीण, भाऊ राहतात. आई मासे विकून घर चालवत होती; तर सानिकाने गेल्या काही महिन्यांत इव्हेन्ट मॅनेजमेंटमध्ये जम बसवला होता, पण आता तिचाच खून झाला.

संशयित सतीश यादव हा दोन वर्षांपासून शिवाजी पेठेत राहण्यास आला होता. येथे तो एका क्लबमध्ये काम करत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीसांच्या एका पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला, तर स्थानिक गुन्हे शाखेसह पाच वेगवेगळी पथके हल्लेखोराच्या मागावर पाठविण्यात आली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!