
पत्नी आणि मुलीच्या त्रासाला कंटाळून व्यापा-याची आत्महत्या
आत्महत्येपुर्वी व्हिडिओत सांगितला पत्नी आणि मुलीकडून होणारा छळ, स्वरावर गोळी झाडत दिला जीव
वाराणसी – वाराणसी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नी आणि मुलीकडून मिळणा-या अपमानास्पद वागणुकीमुळे एका व्यापा-याने आत्महत्या केली आहे. पण आत्महत्येआधी केलेल्या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मनोज कुमार गोंड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. केशवपूर गावातील रहिवासी मनोज कुमार गोंड यांचे कैली रोडवर बांधकाम साहित्याचे दुकान आहे. याशिवाय ते प्रॉपर्टी डीलिंगचे कामही करायचे. मनोज गोड यांनी मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा व्हिडिओ काढून पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. मृत्यूपूर्वी मनोज कुमारने बनवलेल्या व्हिडिओत म्हटलंय की, हॅलो मित्रांनो, आज माझ्या आयुष्यातील अखेरचा दिवस आहे. आज माझीच मुलगी मला मारहाण करत आहे अशी वेळ आली आहे. हे आयुष्य जगण्यासारखे नाही. आज माझी स्थिती सगळे पाहत असतील. माझ्या घरात कुणीही बाहेरचा व्यक्ती आला तर त्याच्याबद्दल मी विचारायचे नाही का..मी याचा विरोध केला तर माझ्या मुलीकडून मला मारण्यात आले, असा दावा त्यांनी केला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मनोज कुमार गोड आदिवासी कार्यक्रमात गेले होते. त्यानंतर पती पत्नीत वाद झाला होता. त्यामुळे व्यथित झालेल्या मनोज कुमार यांनी सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास स्वता: वर गोळी झाडत आत्महत्या केली. यावेळी कुटुंबियांनी त्यांच्याकडे धाव घेतली पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बंदूक मनोजकडे कशी आली याचा तपास सुरू आहे. पोस्टमोर्टम रिपोर्ट आणि साक्षीदार याआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. पण या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.