Latest Marathi News
Ganesh J GIF

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू

अपघाताचे खरे कारण आले समोर, अपघाताची दृश्य धरकाप उडवणारी

मुंबई दि ४(प्रतिनिधी) – टाटा समूहाचे माजी अध्यक्ष शापूरजी-पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात गाडीचा चक्काचुर झाला आहे. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

सायरस मिस्त्री हे २०१२ ते ऑक्टोबर २०१६ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. लंडनमधील इंपिरियल महाविद्यालयातून सायस मिस्त्री यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले होते. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पालनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. त्यांनी २३ व्या वर्षी, सन १९९१ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पालनजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९४ मध्ये शापूरजी पालनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या कंपनीने भारतात सर्वात उंच निवासी टॉवर बांधणे, सर्वात लांब रेल्वे पूल बांधणे आणि सर्वात मोठे बंदर बांधणे यासह अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. सायरस मिस्त्री आणि टाटा समुहामधील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. सायरस मिस्त्री यांनीं शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर पद देखील भूषवले होते. मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील मृतांसह जखमींना टाटा समुहाकडून मोठी मदत करण्यात आली होती. ही मदत मिळवून देण्यात सारयस यांचा मोठा वाटा होता.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!