शालेय साहित्य वाटप करत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा
विकास घडमोडे यांच्या उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदले
बार्शी दि १५ (प्रतिनिधी)- आज सा-या देशभरात देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे अवचित्य साधत बार्शी तालुक्यातील दहिटणे गावात विकास घडमोडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप केले आहे.
दहिटणे गावाला स्वातंत्र्याचा वारसा लाभलेला आहे स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली दहिटणेकरांनी लढा उभा केला होता. त्याच दहिटणे गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साह दिसून येत होता. दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधाविना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्रभात फेरी, कवायत मुलांची देशभक्तीपर गीते, भाषणे यांनी पूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. विकास घडमोडे दरवर्षी त्यांचे दिवंगत वडील मल्लिकार्जुन घडमोडे आणि दिवंगत बंधू साईनाथ घडमोडे यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्याचे वाटप करत असतात यावर्षी त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इग्झाम पॅडचे वाटप केले आहे. नवेकोरे पॅड भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विकास घडमोडे यांच्या या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक ढगे सर आणि शिक्षकांनी काैतुक करत आभार मानले आहेत.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहनदेखील करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर काशीद, शाळेचे मुख्याध्यापक ढगे, पोलीस पाटील बबलू पाटील, शाळा समिती अध्यक्ष संजय काशीद, माजी सरपंच कृष्णात काशीद, माजी उपसरपंच हनुमंत कादे, विकास घडमोडे, बसवेश्वर घडमोडे, स्वरूप चेट्टी, जोतिराम साैंदळे, अतुल काशीद, गणेश काशीद, बळीराम ताटे, पिंटु गायकवाडसह शिक्षक, ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.