Just another WordPress site

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर महिलेच्या आत्मदहनाचा प्रयत्न

पहा महिलेने का केला आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा सुरु असतानाच एका महिलेने अंगावर राॅकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

GIF Advt

जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी वंदना सुनिल पाटील या महिलेच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. या मागणीला घेऊन पती पत्नीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. पण तरीही कारवाई होत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान या महिलेला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. नंतर मात्र समज देऊन सोडून देण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!