Latest Marathi News
Ganesh J GIF

छ. संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर ; ‘त्या’ पत्रामुळे मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; पत्रात नेमकं काय म्हटलं?

छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.मनोज जरांगे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा देणारं पत्र धनराज विक्रम गुट्टे यांनी थेट विभागीय आयुक्तांना दिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. सहा महिन्यापासून चुकीच्या मागण्या आणि जातिवाद निर्माण करून तेढ निर्माण करत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

‘गेल्या सहा महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे चुकीच्या मागण्या आणि जातिवाद निर्माण करून तेढ निर्माण करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा अन्यथा आत्मदहन करू’ असं या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र धनराज विक्रम गुट्टे यांनी विभागीय आयुक्तांना दिलं आहे.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते, मंगळवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान राज्यभर शांतता जागृती रॅली काढणार आहेत. आपल्या दौऱ्याची सुरवात ते विदर्भातून करणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे अभिवादन दौरा करणार आहेत. ते या दौऱ्याची सुरुवात सिंदखेड राजा येथून करणार असून. भगवान गड, गोपीनाथ गड असा तीन दिवसांचा अभिवादन दौरा ते करणार आहेत.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!