Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार गटाच्या सभापतीने नृत्यांगनेवर केली पैशाची उधळण

पैसे उधळतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, सांस्कृतिक कार्यक्रमात अश्लील डान्स, या सात जणांवर गुन्हा दाखल

भंडारा दि २४(प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यात लावणीमध्ये नृत्य करणाऱ्या तरुणीवर पैसे उधळण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील सभापतींनीच हाच प्रकार केला होता. या प्रकरणी सभापतीसह ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यमधील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही येथे मंडई निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पोलीसांनी परवानगी देण्यात आलेली नव्हती. या कार्यक्रमात अश्लील नृत्य करण्यात आला तसेच लावणी सादर करणाऱ्या नृत्यागंणेवर त्यांनी पैशाची उधळण केली गेली. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या डान्स प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. पण सखोल चाैकशी केल्यानंतर
यात अजित पवार गटाचे मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलीसांनी रितेश वासनिक यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज गजभिये, विक्की गायधने आशिष देशकर, दुर्योधन बावनकुळे, विक्की जिभकाटे, आणि अजित पवार गटाचे सभापती रितेश वासनिक आणि इतर एक जण अशा सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यांनी पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांना संपूर्ण प्रकरणची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल करत आहेत.

जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता गावातील मंडईत तमाशा व लावणीचे आयोजन करण्यात आले. लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनेवर या सातही जणांनी पैशाची उधळण केली. सार्वजनिक कार्यक्रमात असभ्य वर्तन व सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी वरठी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!