Latest Marathi News
Ganesh J GIF

छगन भुजबळ होणार भाजपाकडून केंद्रात मंत्री?

अजितदादांची साथ सोडत भुजबळ भाजपाच्या वाटेवर, फडणवीसांच्या बैठकीनंतर सूत्रे हलली?

मुंबई – मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले भुजबळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं असून आठ ते दहा दिवसात चांगला मार्ग काढू असं फडणवीसांनी सांगितल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. पण भुजबळ यांनी अजित पवारांची भेट घेण्याऎवजी फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

अजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्याने ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असून भाजपाकडून त्यांना राज्यसभेवर पाठवत केंद्रात मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. भुजबळ यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून त्याबाबत फडणवीस यांनी ‘दिल्ली’शी बोलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. भाजपा नेतृत्वाकडून ‘ओके’ आल्यावर भुजबळ यांचा भाजपात प्रवेश होईल, या सर्व घडामोडीसाठी आठवडाभराचा कालावधी लागणार असल्यामुळे भुजबळ हे परदेशात गेले आहेत. महायुतीच्या महाविजयात ओबीसींचा वाटा मोठा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपातील अनेक नेते देखील ओबीसी म्हणून भुजबळ यांचे नेतृत्व मान्य करताना दिसतात. त्यामुळे भुजबळ यांना राज्यात ठेवण्यापेक्षा राष्ट्रीय राजकारण घेऊन जाण्याचा विचार भाजपा करत आहे. पण भाजप नेत्यांनी भुजबळांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले होते. आता भुजबळ भाजपात आल्यास भाजपचे कार्यकर्ते दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व समतोल साधत भुजबळ यांचा निर्णय भाजपा घेणार अशी शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज असून, त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार की, ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!