Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मजा पाहत राहा फक्त!

विधानभवनात कायदा आणि सुव्यवस्थेचा धिंडवडे, पडळकर समर्थकाची हीन भाषा, सोशल मिडीयावर टार्गेट

मुंबई – विधानभवन परिसरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जी भांडणाची घटना घडली, ती सध्या राज्यात मोठा गोंधळ माजवणारी ठरली आहे. पण यामुळे जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिला एकदम खालच्या दर्जाची भाषा वापरत ट्रोल करण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड हिलाही सोशल मीडियावर खालच्या स्तरावर ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगवर संतप्त प्रतिक्रिया देताना तिने फडणवीस यांना आणि मुंबई पोलिसांना टॅग करत संताप व्यक्त केला आहे. नताशा आव्हाडने X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की,”जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे. या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढलं जातंय. @Dev\_Fadnavis @MumbaiPolice तुम्ही फक्त मजा पाहत राहा!” यासोबतच तिने एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यात गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असल्याचे प्रोफाईल असणाऱ्या व्यक्तीकडून अत्यंत खालच्या भाषेतील शब्दांत तिला उद्देशून शेरेबाजी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात विधानभवनाच्या आवारात सर्व पत्रकारांसमोर जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना उद्देशून ‘मंगळसूत्र चोर’ म्हटलं होतं. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पडळकरांनी आव्हाडांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. याच सर्व प्रकरणावरून अखेर दोघांचे कार्यकर्ते विधीमंडळाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे.

https://x.com/NatashaASpeaks/status/1945910727803605489?t=GUygp0SMOL8D59-mD24s_w&s=19

विधानभवनाच्या इतिहासात कधीही हाणामारीची घटना घडली नव्हती. कायदे बनवणाऱ्या या पवित्र परिसरात अशा प्रकारे गावगुंडगिरी आणि शिवीगाळ होणे, यामुळे सर्वसामान्यांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!