Latest Marathi News
Ganesh J GIF

पोलीसात असल्याचे सांगत वावरली पण आत्महत्येनंतर वेगळाच खुलासा

फलटणमध्ये आत्महत्या केलेली ती महिला पोलीस नसल्याचे समोर, सोशल मिडीयावर मात्र हजारो फाॅलोअर्स

सातारा दि १(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील फलटन तालुक्यात एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागेश्वरनगर – चौधरवाडी येथे घडली होती. ती महिला कॉन्स्टेबलने असल्याचे सांगितले जात होते. पण पोलीस तपासात वेगळेच सत्य समोर आले आहे.

ऋतुजा सुशांत रासकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. याप्रकरणी ऋतुजा यांचे सासरे बाळू रासकर यांनी फिर्याद दिली होती. त्यावेळी ऋतुजा रासकर या मुंबई शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होत्या. त्या फलटणला आपल्या घरी आल्या होत्या. दुपारच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले. असे सांगण्यात आले होते. पण पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर आला आहे. ती पोलीस नसल्याचे समोर आले आहे. या मागचे कारणही समोर आले आहे. ऋतुजाचा आंतरजातीय विवाह झाला होता. त्यामुळे तिच्या कुटुंबातील लोक तिच्यावर नाराज होते. त्यामुळे प्रेमविवाहाचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून ती  पोलिस  म्हणून वावरत होती. विशेष म्हणजे तिने गेल्यावर्षी तिने सायबर क्राईम मुंबईमध्ये नोकरीला लागल्याबद्दल पेढेही वाटले होते. इतकेच नाहीतर मुंबई पोलिसांच्या पीसीआर बाइकवर बसलेले तसेच खाकी वर्दीतील फोटो ऋतुजाने सोशल मीडियावर अपलोड केले होते. सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स ५० हजारांहून अधिक आहेत. फोटोवरून ती मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याचे सर्वांना वाटले होते. ऋतुजाने नातेवाईक ग्रामस्थांना खोटी माहिती का दिली? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अलीकडे तिने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये बंदोबस्तासाठी असल्याचे फोटो शेअर केले होते. दरम्यान तिने आत्महत्या का केली या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.

फलटण शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी तपास केल्यानंतर हा खुलासा झाला आहे. ऋतुजाने आपण पोलीस असल्याचे सांगितले होते. पण ती पोलीस नाही, हे तिच्या पतीला माहीत होते. घरात सापडलेला बक्कल नंबर दुसऱ्या पोलिसाचा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आत्महत्येच्या कारणाइतकेच ती पोलिस बनून का वावरत होती, त्याचा फलटण पोलिस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!