Latest Marathi News
Ganesh J GIF

‘भाजपात या नाहीतर बुलडोझर कारवाईसाठी तयार राहा’

भाजपा नेत्याची जाहीर सभेत धमकी, वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ व्हायरल

गुना दि २१ (प्रतिनिधी)- नेत्यांची वादग्रस्त विधाने आता नवीन गोष्ट राहिलेली नाही पण आता नेते मंडळी थेट जाहीर सभामधून मतदारांना धमकी देत असल्याचे दिसत आहे.मध्य प्रदेशमध्ये भाजपाच्या एका मंत्र्याने “भाजपात सामील व्हा. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा” अशी धमकी दिली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशमधील पंचायत मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया हे गुना जिल्ह्यातील रुठियाई येथे एका राजकीय कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी त्यांनी भाषण करताना “भारतीय जनता पार्टीत सामील व्हा. हळूहळू आमच्या बाजुने या. २०२३ ला विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात भाजपा सरकार स्थापन होईल. त्यानंतर मामा च्या बुलडोझरसाठी तयार राहा,” असे वादग्रस्त विधान करत धमकी दिली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ‘मामा’ या टोपणनावाने ओळखले जातात. दरम्यान सिसोदिया यांच्या धमकीनंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करत असली भीती दाखवून काही उपयोग नाही. काँग्रेस पदाधिकारी असल्या धमक्यांना घाबरणार नाहीत असे प्रत्युत्तर दिले आहे.

मध्यप्रदेश मध्ये शिवराज सिंह यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार ते विविध गुन्ह्यांतील आरोपींच्या घरांवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बुलडोझर चालवत आहेत. त्यामुळे सिसोदिया यांनी हे वक्तव्य केले आहे. पण यामुळे नवीन वाद सुरु झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!