घटनापीठाचा उद्धव ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेना दिलासा
निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तासंघर्ष तसेच शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली ग्रीन आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. तर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयातील सत्ता संघर्षावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे. अगोदरच्या सुनावणी झाली त्यावेळेस निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता शिंदे गटाची मागणी मान्य करत घटनापीठाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ न्यायालयाने शिवसेनेत फूट पडल्याचे मान्य केले आहे. सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे.आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी उद्दव ठाकरेंच्या वतीने मागणी करण्यात आली होती.निवडणूक आयोगाला बहुमताची कशाप्रकारे चाचपणी करायची याचा पूर्ण अधिकार आहे. निवडणूक आयोग आधी तक्रार घेतं, नंतर पुरावे, प्रतिज्ञापत्र आणि चौकशी करतं हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आहे.
शिवसेनेचा ठाकरे गट हा निवडणूक आयोगाला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सिब्बल यांनी त्या दिशेनेच युक्तीवाद केला होता. शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेच आहेत, निवडणूक चिन्हही त्यांच्याकडेच आहे. यामुळे निवडणूक आयोग आता यावर निर्णय घेणार आहे. बहुमत चाचणी आधी ठाकरेंनी दिलेला राजीनामा शिंदे गटाच्या पथ्यावर पडला आहे.