
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात आहेत. एकमेकांवर जोरदार टीका सुरु आहेत.अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलताना संजय राऊतांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राणा यांच्यावर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. नवनीत राणा यांच्या नाची… असा उल्लेख त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीची लढाई देशाची लढाई आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि नाची विरोधातील नाही. एका डांसर विरोधातील नाही. एका बबली विरोधातील नाही. तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे. ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.आता नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिलीये. ‘अंबानगरी म्हणून अमरावतीची ओळख आहे. तिथेच येऊन संजय राऊत यांनी एका महिलेचा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. विशेष म्हणजे माझ्या नणंदबाई त्याच मंचावर होते. त्यांनी राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर खिल्ली उडवली हे मोठं दुखः आहे.
ज्या मुलीला तुम्ही सासरी पाठवलं त्या मुलीला विचारा, ज्या आईने तुम्हाला जन्म दिला तिला विचारा तुम्ही काय शब्द वापरलाय?’, असा सवाल करत नवनीत राणांनी राऊतांवर पलटवार केलाय. वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी प्रचार सभा होणार, असून यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी संजय राऊतांना कडक शब्दात प्रत्युत्तर दिलं