Latest Marathi News
Ganesh J GIF

‘दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच’

प्रेमवेड्या तरूणीने आमदार रोहित पवारांकडे मागितला सल्ला, रोहित पवारांनी दिल 'हे' उत्तर

अहमदनगर दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच तरुणाईशी संवाद साधत असतात. नुकताच त्यांनी आस्क मी एनिथिंक हा उपक्रम सुरु केला आहे. याचदरम्यान, एका तरुणीने रोहित पवार यांना विचारलेल्या एका प्रश्नाची सध्या चर्चा होत आहे. त्याचबरोबर पवारांच्या बॅलन्स उत्तराची देखील चर्चा होत आहे.

कल्याणी मोरे या नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून रोहित पवारांना प्रश्न विचारण्यात आलाय. ‘दादा माझे एका मुलावर खूप प्रेम आहे आम्ही दोघे लग्न पण करणार आहोत, पण मुलाच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होत नाहीत. म्हणून आम्ही दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मते मी काय करू..?’ असा प्रश्न विचारण्यात आला. विशेष म्हणजे या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवान म्हणाले की, पळून जाण्यासाठी आई-वडीलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा!रोहित पवार यांचं हे उत्तर सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने रोहित पवारांना विचारलं, “जर तुमचा बायोपिक करायचं ठरलं, तर तुमच्या व्यक्तीरेखेसाठी तुमची निवड कोण असेल? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी , “माझा रोल मलाच करायला आवडेल.” असे उत्तर दिले.तर आजोबा शरद पवार यांच्याकडून कोण-कोणत्या गोष्टी शिकलात, ज्याचा तुम्हाला खूप फायदा झाला? असा प्रश्न एका युजर्सने विचारला. त्यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, गरम वातावरणात डोकं शांत ठेवणे या गोष्टी शिकल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्याच्या धोरणात युवांचं प्रतिबिंब उमटावं आणि राज्य विकासाच्या शिखरावर पोहोचवावं यासाठी रोहित पवार यांनी ट्विटर वर #AskRohitPawar या हॅशटॅगखाली ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ संदर्भात मी आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, असे म्हणत कोणतेही प्रश्न विचारा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!