Latest Marathi News
Ganesh J GIF

नांदेड जिल्ह्यातील पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा

दरोड्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद, एका दरोडेखोराला गावकऱ्यांचा चोप

नांदेड दि १(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी येथील पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी २ लाख ४ हजार रुपयांची रोकड पळवली आहे. विशेष म्हणजे या नंतर सापडलेल्या एका दरोखेखोराची गावकऱ्यांनी चांगलीच धुलाई केली आहे.

सिंधी येथे उमरी-नांदेड महामार्गावर कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगरशेती सहकारी पतसंस्था आहे. आज दुपारीच्या सुमारास नांदेडकडून तीन बाईकवरून सहा दरोडेखोर येथे दाखल झाले. काही कळायच्या आत सहाही दरोडेखोर हातात तलवार घेऊन पतसंस्थेत घुसले. त्यांनी पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना तलावारीने धमकावत पतसंस्थेतील दोन लाख रुपयांची कॅश लुटली. कॅश लुटून हे दरोडेखोर दुचाकीवरुन पळून जात होते. पण पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी आरडा ओरडा केल्याने आजूबाजूची लोक धावून आले. त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करत एकाला पकडले, तर बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीला नागरिकांनी बेदम चोप दिला आहे.

 

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उमरी येथील पोलीस निरीक्षक मोहन भोसले, नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी पोहोचले आहेत. पतसंस्थेतील सीसीटीव्हीत दरोड्याची थरारक घटना कैद झाली आहे. पोलिसांनी एका दरोडेखोरास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. भरदिवसा दरोड्याची ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!