Just another WordPress site

प्रेमभंग झाल्याने तरूणाने रेल्वे डब्यावर चढत केले धक्कादायक कृत्य

पुणे रेल्वे स्थानकातील घटना कॅमे-यात कैद, बघा तरूणाने नेमके काय केले

पुणे दि १(प्रतिनिधी) – पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमभंगातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रेल्वेवर चढून त्याने विद्युत तारांना स्पर्श करत आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. प्रेमप्रकरणातून हे कृत्य करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोवर्धन मल्ला या तरूणाने पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी प्रेम भंगातून आत्महत्येचा प्रयत्न केला.तो कटकचा असून खेड तालुक्यातील खळ उंबरे या गावातील एका कंपनीत कामाला होता.पुणे गोरखपुर एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर उभी होती. त्यावेळी त्याने रेल्वेच्या डब्यांवर चढण्याचा प्रयत्न केला.त्याला 2 वेळा रेल्वे कर्मचाऱ्यांनी हटकले. परंतु तिसऱ्या वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांची नजर चुकवून हा तरुण गोरखपूर एक्सप्रेसच्या डब्यांवर चढला आणि त्याने हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावला.तारांचा स्पर्श झाल्याने करंट लागून तो जखमी झाला आहे.त्याच्यावर ससुन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

GIF Advt

विद्युत तारांना स्पर्श केल्याने त्याच्या संपूर्ण शरीराभोवती आगीचे लाटा होत्या. ही घटना सकाळी घडली. यात हा यात तरुण ७० ते ८० टक्के भाजला आहे. प्रत्यक्ष दर्शी त्याला थांबवत होते, तरीही त्याने हायहोल्टेजला हात लावला आणि ही दुर्घटना घडली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!