Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपाच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी

लोकप्रतिनिधींना धमक्यांचे सत्र सुरूच, महिला आमदाराला पत्र पाठवत धमकी, कारण काय?

बुलढाणा – महाराष्ट्रातील भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. धमकी देण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीनंतर आता भाजप आमदारालाही अशी धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. श्वेता महाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म असून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्हा परिषदेतून केली होती. अभ्यासू आणि आक्रमक स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. महिला, शेतकरी आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका आहे आणि त्या नेहमीच यावर आवाज उठवत असतात. चिखली मतदारसंघात १५ वर्षांपासून भाजपला विजय मिळवता आला नव्हता. २०१९ मध्ये भाजपने श्वेता महाले यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे दोन वेळा आमदार राहिलेले राहुल बोंद्रे यांचा ६,८५१ मतांनी पराभव केला. त्यांना ९२,२०५ मते मिळाली तर बोंद्रे यांना ८५,४३३ मते मिळाली. २००४ नंतर भाजपला या मतदारसंघात प्रथमच विजय मिळवता आला होता. या पत्रात श्वेता महाले यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. दरम्यान, हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. यावर प्रतिक्रिया देताना महाले यांनी म्हटलं की. मी या प्रकरणात तक्रार दाखल करणार आहे. पोलिसांनी अशा लोकांन समोर आणून त्यांचा बुरखा फाडावा, अशी मागणी केली आहे. आता या धमकीप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार, तसेच सरकार लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी कोणती उपाययोजना करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्या मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे अशा या दोन आरोपींना मुंबई एटीएसने अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या धमकी मागेल नेमकं कारण काय? हे  तपासानंतर कळू शकणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!