Latest Marathi News
Ganesh J GIF

महाविकास आघाडीच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी ? पोलिसांत तक्रार दाखल, नेमके प्रकरण काय ?

बदलत्या काळानुसार निवडणुकीतील जाहीराती देखील बदलल्या आहेत. नवनव्या शकला लढवून पक्ष आपल्या पक्षाची जाहीरात करताना दिसतात. सध्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क मागतोय महाराष्ट्र हे जाहिरात कॅम्पेन रावबत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडीच्या एका जाहिरातीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य करत त्यांचे पात्र दाखवण्यात आले आहे. आता, या जाहिरातीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जाहिरातीमधील मजूकर आणि अजित पवारांच्या पात्राचा उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीतून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीच्यावतीने केला जात असल्याचे, बदनामीकारण मजकूर, खोट वृत्त आणि वादग्रस्त आशयाची व्हिडिओ जाहिरात बनवून अजित पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.दरम्यान, महायुतीमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे पात्र दाखवून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोशल मीडिया पेजवर अनेक व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. तक्रार करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला अजित पवार यांच्या कार्यालयात येते तेथे त्या दोघांमध्ये संवाद होतो. महिला भगिनीशी बोलताना अजित पवार हे महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये दिले ना असे सांगताना दिसून येतात. मात्र, ह्या दीड हजारांचा दादा तुमचा वाद फसवा असल्याचं ती महिला म्हणते. गुलाबी जॅकेट आणि ढोकळा खाताना अजित पवारांचे पात्र जाहिरातीमध्ये साकारण्यात आले आहे. महागाई वाढल्याने महाराष्ट्र त्रस्त असून तुम्ही तुमच्या सत्तेत मस्त असल्याचे महिला म्हणते.

सध्या, सोशल मीडियावर ही जाहिरात चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. १५०० रुपयांत काही होत नाही, कारण महिन्याचा खर्च १५ हजारांवर गेलाय, खोटा दादा, फसवा वादा.. असेही जाहिरातीमधून म्हटले आहे. दरम्यान, आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यावर आता काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!