दिल्ली हादरली ! एकाच घरात आढळले ५ मृतदेह; वडिलांनी चार मुलींसह स्वत:ला संपवले, घटनेमागचे नेमकं कारण काय?
दिल्लीमध्ये एकाच घरात पाच मृतदेह सापडले. दिल्लीच्या रंगपुरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी चार मुलींसह स्वत:ला संपवून घेतलं. ५० वर्षीय हिरालाल हे कुटुंबासोबत वसंत कुंज परिसरातील रंगपुरी भागात भाड्याच्या घरात राहत होते. चार मुलींसह आणि स्वतः विषारी पदार्थ खाऊन पाच जणांनी आत्महत्या केली.
घरातून सडण्याचा वास येत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला तेव्हा हादरून गेले, कारण पाचही मृतदेह सडल्यामुळे दुर्गंधी येत होती घटना शुक्रवारची, दिल्लीच्या रंगपुरी गावातील आहे. हिरालालने विषारी पदार्थ खाऊन आपल्या चार मुलींसह आत्महत्या केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून चारही मृतदेह बाहेर काढले. चारही मुली विकलांग असल्याने चालण्या-फिरण्यामध्ये असमर्थ होत्या. वसंत कुंज पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. डीसीपी रोहित मीना यांनी ही माहिती दिली.
५० वर्षांचा हीरा लाल कुटुंबासह रंगपुरी गावात भाड्याच्या घरात राहत होता. पत्नीचा मृत्यू आधीच झाला होता. कुटुंबात १८ वर्षांची मुलगी नीतू, १५ वर्षांची निशी, १० वर्षांची नीरु आणि ८ वर्षांची मुलगी निधी होती.वसंत कुंज येथील स्पायनल इंजरी हास्पिटलमध्ये नोकरीला होता. हीरालालवर मुलांच्या देखभालीची जबाबदारी होती. शुक्रवारी हीरालालच्या फ्लॅटमधून दुर्गंधी यायला सुरुवात झाली. आसपासच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी बेडवर हीरालालचा मृतदेह पडलेला होता. दुसऱ्या खोलीत चारही मुलींचे मृतदेह होते.