Latest Marathi News
Ganesh J GIF

माऊली कटके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा ; यशवंत,घोडगंगा कारखाना मीच सुरु करणार – अजित पवार

(लोणी काळभोर प्रतिनिधी – चंद्रकात दुंडे ) – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा लोणी काळभोर येथेआयोजित करण्यात होती, यावेळी अजित पवार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले,महाविकास आघाडी लोकांची दिशाभूल करत आहे. मनाला वाटेल त्या घोषणा करून लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोणी काळभोर तसेच शहराच्या विकासासाठी १३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्यात समविचारी सरकार असणं आवश्यक आहे. सत्ता आल्यानंतर शिरूर-हवेली मतदारसंघातील यशवंत साखर कारखान्याचा प्रश्न आपण सोडवू. नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु करू. तसंच मेट्रोचा विस्तार करू असे आश्वासन अजित पवार यांनी जनतेला दिले.

लोकसभेत विरोधकांनी फेक नरेटीव्हचा वापर केला आणि आपल्याला त्याचा फटका बसला. मात्र आता विधानसभा निवडणुकीत तसं होता कामा नये. कुणीही गाफिल राहू नका. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. महायुती सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यात कोणताही समाजघटक वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही असल्याचे अजित पवार म्हणाले . तसेच लाडकी बहीण योजना, शेतकरी वीजबिल मोफत, युवा प्रशिक्षण कार्यक्रम, ३ गॅस सिलेंडर मोफत, दुधाला ७ रुपये अनुदान असे निर्णय तुमच्या-आमच्या हक्काच्या सरकारनं घेतले. या योजना सुरू ठेवायच्या असल्यास महायुतीला मतदान करा, हीच विनंती आहे. आम्ही योजना सुरू केल्यानंतर त्यावर टीका झाली. आता विरोधकांच्या जाहीरनाम्यात आमच्याच सर्व योजना दिसत आहेत. विरोधक आम्हाला म्हणत होते की, घोषित योजनांसाठी पैसे कुठून आणणार. आता महाविकास आघाडी कुठून पैसे आणणार ? याचं उत्तर त्यांनी द्यावे असे अजित पवार म्हणाले

महाविकास आघाडी लोकांची दिशाभूल करत आहे. मनाला वाटेल त्या घोषणा करून लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोणी काळभोर शहराच्या विकासासाठी १३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्यात समविचारी सरकार असणं आवश्यक आहे. सत्ता आल्यानंतर शिरूर-हवेली मतदारसंघातील यशवंत साखर कारखान्याचा प्रश्न आपण सोडवू. नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु करू. तसंच मेट्रोचा विस्तार करू असे ठोस आश्वासन अजित पवार यांनी दिले

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!