उपमुख्यमंत्र्याचे पत्नीची प्रजासत्ताक दिनादिवशी चित्रपटात एंट्री
'या' चित्रपटात मिळाला ब्रेक, पहिलेच गाणे सुपर हिट, बघा नवेकोरे गाणे
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आपण आत्तापर्यंत अल्बममध्ये गाणी गाताना पाहिले आहे. पण आता अमृता फडणवीस यांना थेट चित्रपटात संधी मिळाली आहे. आगामी ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील देशभक्तीपर गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गाणे त्यांनी गायले आहे.
बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘भारतीयन्स’ या चित्रपटाचा टिझर लाँच केला होता. अमृता फडणवीस यांनी प्रजसत्ताक दिनाचे औचित्य साधत त्या चित्रपटातील एक नवे गाणे चाहत्यांसासाठी घेऊन आल्या आहेत. आगामी ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील देशभक्तीपर गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गाणे त्या गायल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. गाणे रिलीज होताच चाहत्यांकडून गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आणि तसेच गाण्याच्या या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. तसेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्या लाँच करत असलेल्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
Wish you a very happy #RepublicDay2023 !
It was an honour to Sing patriotic song ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ for upcoming Multilingual movie BHARATEEYANS 🇮🇳 .Music by Shri Satya Kashyap. It’s a must listen song on #RepublicDay -watch song on 👉 https://t.co/JaxjarjwmA 🙏 pic.twitter.com/82M0CkyXyg— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 26, 2023
अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्या सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अलीकडच्या काळात अमृता फडणवीस यांचे ‘आज मै मूड बना लेया’ हे पंजाबी गाणे चाहत्यांच्या भेटीला आले होते. ६ जानेवारी रोजी हे गाणे रिलीज करण्यात आले होते. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता.