
धनंजय मुंडे यांना दवाखान्यात जाण्याची नेहमीच हौस असते
धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा मोठा आरोप, जुना इतिहास काढत मुंडेबाबत केला मोठा गाैप्यस्फोट
मुंबई – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांसमोर १५ दिवसांपूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. यातून ते सावरत नाही तोच त्यांना Bell’s palsy नावाचा आजार झालेला आहे. त्यामुळे त्यांना बोलताना त्रास होत आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांना बेल पाल्सी नावाच्या आजाराची लागण झाली आहे. धनंजय मुंडे नाटक करत असून, तोंड लपविण्याचा हा प्रकार आहे, असे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांना दवाखान्यात जाण्याची नेहमीच हौस असते. घरातही भांडण झाल्यावर ते नेहमी दवाखान्यात जात असे, असेही करुणा मुंडे म्हणाल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्या मविआ मंत्रिकाळात सर्वांनी पाहिले की प्रत्येक वर्षे किमान १० ते १५ दिवस त्यांनी रुग्णालयात काढले. त्यांचा हा बहाणा असू शकतो. धनंजय मुंडे खरेच आजारी असतील, आणि त्यांना सारखेच दवाखान्यात जावे लागत असेल तर त्यांनी थेट राजीनामा द्यावा आणि दवाखान्यात भरती व्हावे नाहीतर घरी आराम करावा. मी २७ वर्षे घरात पाहिलेले आहे. थोडाही वाद झाला तर दवाखान्यात लगेच जाई आणि तिथे आराम करत असे, असा हल्लाबोल केला आहे. धनंजय मुंडे ११ नोव्हेंबर २०२१ रोजी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. आम्ही अलिबागला मनीषच्या बंगल्यावर होते. त्यांनी फोन केला, आमचे भांडण झाले. त्यानंतर मी कुणालाही न सांगता लीलावतीमध्ये गेले तर धनंजय मुंडे हसत खेळत होते, असा गाैप्यस्फोट करुणा मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे, तो त्यांनी दिलाच पाहिजे. त्यांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यामुळे हा तोंड लपविण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल करुणा मुंडे यांनी केला आहे. दरम्यान आजारामुळे धनंजय मुंडे काही दिवस आराम करणार आहेत.