Latest Marathi News
Ganesh J GIF

धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी धमकी देत स्कॉर्पिओ पेटवली

धनंजय मुंडेंची रिव्हॉल्व्हर दाखवत धमकी, किशोर फड प्रकरणाचा एफआयआर व्हायरल

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढत आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही मुंडे यांचा पाय अजूनही खोलात आहे. कारण आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा संबंध दाखवणारा एक दस्तावेज व्हायरल झाला आहे.

धनंजय मुंडेंचा २००७ मधला एक एफआयआर व्हायरल झला आहे. यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचंही नाव आहे. किशोर फड यांना गाडीमध्ये कोंडून जाळण्याचा प्रयत्न केल्याचं हे प्रकरण आहे. १८ एप्रिल २००७ चा FIR व्हायरल झाला असून या व्हायरल होत असलेल्या FIR सोबत एक मॅसेज देखील व्हायरल होतोय. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं यात म्हटलं आहे. सन २००७ मध्ये किशोर फड याला जीवे मारण्याच्या आणि गाडी जाळल्याच्या प्रकरणात दोघे आरोपी आहेत असंही नमूद करण्यात आलेलं आहे. भंगारचं टेंडर घेण्यावरुन धनंजय मुंडे आणि किशोर फड यांच्यात वाद झाला होता. किशोर फड यांच्या मेव्हण्याच्या स्कॉर्पिओ गाडीवर पेट्रोल टाकून ती जाळण्यात आली. आतमध्ये किशोर फड होते. आरोपींना गाडीचा दरवाजा बाहेरुन दाबून धरला होता. मात्र गाडीचा स्फोट झाल्याने बाकीचे लोक पळून गेले, त्यामुळे ते गाडीतून बाहेर पडू शकले, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. बीडमध्य एकीकडे हा एफआयआर आणि मॅसेज व्हायरल होत आहे. यावेळी परळी पोलिसांनी धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराडसह २५ जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात धनंजय मुंडे यांच्या हातात बंदूक होती असा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीप्रकरणात वाल्मीक कराड अटकेत आहे. वाल्मीक करडा आपला खास माणूस असल्याचं धनंजय मुंडे यांनी भर कार्यक्रमात सांगितले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!