Latest Marathi News
Ganesh J GIF

धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या पैशाच्या गाड्या पकडल्यामुळेच मला…

निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा धक्कादायक दावा, व्हिडीओ व्हायरल, पोलीसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह?

बीड – बीड पोलीस दलातील एका पीएसआयचे निलंबन करण्यात आले आहे. रणजित कासले असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. बीड पोलीस अधीक्षकांनी बुधवारी पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांना निलंबित केल्याचे आदेश जारी केले आहेत.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्यामागील आरोपाचे शुक्लकाष्ट थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता तपासात तडजोड केल्याच्या आरोपावरून बीडचे पीएसआय रणजित कासले यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनानंतर कासले यांनी व्हिडीओ बनवत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या गाड्या अडवल्या म्हणून आपली बदली केल्याचा आरोप कासले यांनी केला आहे. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या पैसे आणणाऱ्या अनेक गाड्या पकडल्यामुळे, त्यांनी परळीत बंदोबस्त लावला होता. मी गाड्या चेक करत होतो, म्हणून मला त्या दिवशी काम नाही सांगितले, परंतु, पेट्या येण्याच्या दिवशीच मुंडेंनी माझ्याकडून बंदोबस्त मागे घेतला आणि मला आरक्षित ठेवले. त्याच दिवशी, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन खात्यातून माझ्या खात्यात १० लाख रुपये जमा झाले. ते का झाले? याबाबत प्रश्न उपस्थित करत, रणजित कासलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रींना तपास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच एका महिलेच्या सांगण्यावरून, बिल्डर आणि त्याच्या पत्नीने आपल्याला टार्गेट केले आणि त्यांच्या संमतीनेच निलंबन करण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच आपल्या कुटुंबीयांना त्रास न देता, स्वतःकडे असलेले पुरावे लवकरच लोकांसमोर मांडण्याचा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणामुळे मुंडे आणि कराड अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

पाच महिन्यांपूर्वी नियंत्रण कक्षातून सायबर विभागात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्याकडे सायबर गुन्ह्यातील प्रकरणाचा परराज्यातील तपास सोपवण्यात आला होता. पण या प्रकरणात त्यांनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशीअंती उपनिरीक्षक रणजित कासले दोषी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!