Latest Marathi News
Ganesh J GIF

तुझे अठरा तुकडे करीन म्हणत धनंजय मुंडेंची करुणा मुंडेंना धमकी

मुंडे समर्थकांकडून करुणा मुंडेंना अश्लील धमक्या, या कारणामुळे मुंडेची धमकी, नेमक काय घडलं

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामागील अडचणी संपण्याचे नाव कमी होत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांच्यावर आरोप होत असताना आता त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

करुणा मुंडे यांनी आमदार धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणूकीत आपल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला असून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे  तुझे १८ तुकडे करुन तुला संपवेन, अशी धमकी धनंजय मुंडे यांनी दिल्याचा दिल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. याबाबतचे काॅल रेकार्ड न्यायालयात सादर करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचे लोक मला सतत फोन कॉल, मेसेजेस करुन धमकी देत आहेत. तुझे आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करु, तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाऊ अशा धमक्या या लोकांकडून दिल्या जात असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी देखील मला तुझे १८ तुकडे करीन अशीजीवे मारण्याची धमकी दिली आहे. धनंजय मुंडे हे कोर्टाच्या आदेशांना न जुमानता आपल्याला दररोज धमक्या आणि एआयच्या माध्यमातून मॉर्फ केलेले व्हिडीओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत आहेत, अशी लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाची ऑर्डर असताना धमक्या देणे सुरु असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, धमक्या देऊ नये. हिंसेच्या गोष्टी करू नये. तसेच ६० लाख रुपये अद्यापही येणे बाकी आहे. ती रक्कम वसूल होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या सर्वांबाबत ६ जूनपर्यंत म्हणणं सादर करण्यासाठी धनंजय मुंडे यांना मुदत देण्यात आली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावे” असे आव्हान करुणा मुंडे यांनी केले आहे. तसेच अजून मी मुंडे कुटुंबाबद्दल 50 टक्के पण तोंड उघडले नाही. उघडायला लाऊ नका, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

 

ते किती पाण्यात आहेत, हे मी दाखवून देणार आहे. एफआयआर करा असे मी सांगितले होते, पण काहीही केले नाही. मला संरक्षण द्यायला कोर्टात सांगितले आहे, मात्र अद्याप काही केले नाही. मुलीला घेऊन जाणार अशी मला धमकी दिली जात आहे. तसेच मी पोटगी संदर्भात कोर्टात याचिका लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!