
धनंजय मुंडेंच्या पत्नीला वाल्मीक कराडची मारहाण?
मुंडेंच्या पत्नीचा धक्कादायक गाैप्यस्फोट, म्हणाल्या कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात मला...
बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे सतत अडचणीत येत आहेत. आता तर वाल्मीक कराड याचे नवीनवीन घोटाळे बाहेर येऊ लागल्यामुळे मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव येत आहे. पण आता मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
धंनजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपले पती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. करुणा मुंडे यांनी एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी म्हटले आहे, “माझ्या नवऱ्याने मला जिवंत गाडले असते तरी चालले असते, पण एक दोन कवडीच्या गुंडानी मला माझ्या नवऱ्यासमोर मारले. तसेच वाल्मिक कराडने आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण केली. पण धंनजय मुंडे आणि पोलिसांकडून त्यांना मदतीची अपेक्षा असताना त्यांनी काहीच मदत केली नाही, असा दावाही करुणा मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर करुणा मुंडे यांनी थेट हायकोर्टात धाव घेत धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप होता. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप केला होता. दरम्यान करुणा मुंडे तुमच्या सौभाग्यवती आहेत. त्या पहिल्या पत्नी आहेत, असे मी जबाबदारीने सांगतो. असा गाैप्यस्फोट आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. कराडवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडसह आणखी चार जणांना अटक झाली आहे.